गेले काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ आहे.
(त्यात नवं काय? असं माझे काही मित्र/सहकारी म्हणतीलच; त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन) माझ्या अस्वस्थतेचं कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचंय.
या पावसाळ्यातला पहिला पाऊस पडला त्या संध्याकाळी मी चक्क घरी पोचलेलो होतो. पावसाच्या पहिल्या थेंबांपासून माती ब्रँडचा हलकासा सुवास दरवळत होता, सिमेंटच्या साम्राज्यात इतकी वर्ष काढूनही मातीनं आपला गुण सोडला नव्हता हे विशेष. वीज कार्यालयात कोणी तरी रसिक माणूस असावा त्यानं योग्य वेळ साधली आणि साधारण ८ च्या सुमारास अचानक लाईट गेली. मुंबईत सहसा न एकू येणारी शांतता ऐकू येऊ लागली.
पुढचा जवळपास अर्धा तास बाहेर पहिला पाऊस, मातीचा सुगंध, शांतता आणि अंधार… वातावरण एकदम रोमँटिक का काय म्हणतात तसं होतं. (टीप:- बायको घरातच होती पण दोन्ही लेकरंही घरातच होती, असो) Continue reading