कात्रज ते सिंहगड ट्रेकचा थरार

गेल्यावर्षी मी, प्रशांत, माणिक आणि मयुरेशनं कात्रज ते सिंहगड संध्याकाळी ६ ते पहाटे ५ असं जवळपास ११ तासात सर केलं होतं. यंदा आमचा ग्रुप वाढला होता कळसुबाई, भीमाशंकर आणि वासोटा ट्रेकमुळे आत्मविश्वास  वाढलेला मेघराज पाटील, पुण्याहून  मंदार गोंजारी येणार  हे जवळपास नक्की होतं. अभिजीत करंडेचा सस्पेन्स आदल्या रात्रीपर्यंत कायम होता. यशस्वी शिष्टाई, सहकाऱ्यांची थोडी साथ आणि बॉसचा मोठेपणा कामाला आला आणि अभिजितचा मार्गही मोकळा झाला. सचिन ढवण येणार असं ऐकत होतो पण फार सिरियसली घेतलं नव्हतं, तो ही ऐनवेळी आला. थोडक्यात आम्ही ८ जण असणार होतो.

प्रशांत, माणिकची पॉवर नॅप

बुटाची ZZ संपवून मी ३-३.३० ला पुणे कार्यालयात पोचलो. प्रशांत आणि माणिकची स्टुडिओत वामकुक्षी सुरु होती. स्टार प्रवाहवाल्यांनी मस्त जेवणाचा बेत केला होता त्याची सुस्ती दिसत होती. निकालासाठी आलेला प्रणव पोळेकरही तिथे होता, तो माझ्यासाठी थेट ताट घेऊन आला. कोणाला आणि कशालाच नाही म्हणायला आपल्याला कधीच जमत नाही, खायच्या बाबतीतही तेच. थोडी भूक लागली होतीच त्यात भाकरी, मस्त रस्सा भाजी आणि कांदा होता, नाही म्हणनं अवघड गेलं. रानातल्यासारखं मस्त तिखट आणि चविष्ठ जेवण होतं, तुटून पडलो. Continue reading