टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये

मीडिया बाजार

दूरदर्शनवर रामायण अवतरलं त्यावेळी देशभरात रस्ते ओस पडायचे. रामानं रावणाचा वध केला त्या रविवारी कित्येत घरात टीव्हीवर फुलं उधळली गेली. तोच प्रकार कमीअधिक प्रमाणात महाभारताच्या वेळी. शक्तिमान सुरु होतं तेव्हा स्वत:चा एक हात छातीवर आणि एक हात वर करत स्वत:भोवती गरगर फिरत वरुन खाली झोकून देणाऱ्या कितीतरी लेकरांनी हात पाय मोडून घेतले, काहींना जीवही गमवावा लागला. कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनच्यावेळी स्पर्धकांसोबत रडणारे आणि नवाथे करोडपती बनला तेव्हा ते कोटभर रुपये आपल्याच घरात येणार असा आनंद झालेले कमी नव्हते. टेलिव्हिजनची ताकद, माध्यमाचा प्रभाव अधोरेखित करणाऱ्या घटनांची ती नांदी होती.

बातम्यांची मक्तेदारी तेव्हा सरकारी दूरदर्शनकडेच होती. लोकांच्या गरजांचा विचार करायचा नाही आणि काळासोबत चालायचं नाही हा अलिखित सरकारी नियम दूरदर्शननेही इमानेइतबारे पाळला. त्यामुळेच, गरज होती म्हणा किंवा एखादा नवा पर्याय मिळाला की लोक स्वीकारतात म्हणा, खाजगी न्यूज चॅनल्स कधी आले, कधी वाढले, कधी पुढं गेले हे कळलंही नाही. Continue reading