खऱ्याच्या आयला…

अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानं अनेकांना प्लॅटफॉर्म मिळवून दिला. मैदानाच्या नावातच रामलीला आहे म्हणल्यावर त्याचा थोडाफार परिणाम तरी या स्टेजवर जाणारांवर होणारच ना. ओम पुरी हा गुणी अभिनेता त्यातून कसा सुटेल? भर मैदानात, लाखो लोकांच्या समोर ओमपुरींनी आपल्या  काही राजकारण्यांना, आमदार, खासदार मंत्र्यांना  चक्क अनपढ, गंवार, नालायक म्हणण्याची असभ्यता किंवा डेरिंग दाखवली. कोणाला वाटलं तो ‘अंमला’खाली बोलला तर कोणी म्हणालं भावनेच्या भरात. ‘न ब्रुयात सत्यम अप्रियम्’ अर्थात ‘सत्य अप्रिय असेल तर ते नाही बोललं पाहिजे’ हे त्याला बिचाऱ्याला माहित नसावं किंवा तो ही (माझ्यासारखाच) सवयीचा गुलाम असावा त्यामुळे गरज नसताना त्याच्याकडून एक-दोन जास्तीचे शब्द गेले असावेत.

तोल मोल के बोलओमपुरी जे बोलला त्यामुळे संसदेचं पावित्र्य, संसदेचा मान, आपला विशेषाधिकार वगैरे राजकारण्यांना आठवला आणि अण्णांमुळे जेरीला आलेल्या तमाम लोकप्रतिनिधींना एक सॉफ्ट टारगेट सापडलं, ते फार कमी वेळा होतात तसे एक झाले. Continue reading