K 2 S ट्रेक: पूर्वतयारी

पुढच्यावेळी तयारी करायची, चांगला प्लॅन करायचा, यावेळच्या चुकातून शिकायचं वगैरे वगैरे बरंच काही ठरवलं होतं. एक वर्ष लोटलं त्या ट्रेकला. यंदा K2S २९-३० जुलैला आहे हे प्रशांत कदमनं खरंतर दीड महिन्याभरापूर्वीच सांगितलं होतं तरीही पार्किनसन्स लॉ कामाला आला आणि अँडरसनला खेळताना अभिनव मुकूंदची कमी पळापळ झाली असेल तशी आमची धावपळ सुरु झाली. बुट, बॅटरी, बॅग घेणं बाकी होतं.

गेल्यावर्षी मी माझे क्रिकेटचे बुट नेले होते. जे काही ८-१० डोंगर आहेत ते चढायला, उतरायला म्हणजे घसरायला मला त्याची मोठी मदत झाली. त्या सिंहगड मोहिमेवरच ते बुट कामी आले. वुडलँड होता; तो ८ महिने कुठल्याही डोंगरावर चालू शकेल मात्र पावसाळ्यात तो काही कामाचा नाही हे माहित होतं. पावसाळ्यातल्या ट्रेकचा आनंद लुटायचा असेल तर चांगले बुटं पायात असायलाच पाहिजेत. Continue reading