‘मी अण्णा हजारे’ नाही, तरीही…

माझा या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठींबा आहे, जनलोकपालमधले कच्चे दुवे माहिती असुनही…

याला अनेक कारणं आहेत…

बऱ्याच वर्षांनी; माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच, चांगल्या कामासाठी देशभरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं पाहतोय. देशातली तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलीय. जात-धर्म-भाषा-प्रांत-राजकीय पक्ष अशी बंधनं झुगारुन देशाच्या सर्व भागात लोक लाखोंच्या संख्येनं अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामिल झाल्याचं चित्र दिसतंय. अण्णा हजारेंनी ५ महिन्यांच्या आत ही किमया दुसऱ्यांदा करुन दाखवली.

तरुणाई रस्त्यावर

याची बीजं एप्रिलमध्येच रोवली गेली होती. जनलोकपालसाठी अण्णा दिल्लीत पोचले तेव्हा; महाराष्ट्रातला ७४ वर्षाचा एक भगतसिंग-सुखदेव-राजगुरुंना मानणारा गांधीवादी म्हातारा अधनंमधनं उपोषण करतो, त्याचा इगो सांभाळला, गोड गोड बोलून काही आश्वासनं दिली की लिंबूपाण्याचा पेला ओठाजवळ नेतो उपोषण सोडतो, अशी अण्णांबद्दलची माहीती दिल्ली दरबारी असलेल्या मराठी मंत्र्यांनी श्रेष्ठींना पुरवली असेल कदाचित किंवा Continue reading

किस्सा ‘विकसित’ गावाचा

पंतप्रधान मनमोहनसिंह यांचं भाषण ऐकून प्रचंड फ्रस्ट्रेशन आलं. विविध संकटांचा सामना करत स्वत:ला जिंवत ठेवणाऱ्या जनतेसमोर स्वातंत्र्यदिनी कोणत्याही देशाचा पंतप्रधान/राष्ट्रपती/प्रमुख इतके निगेटिव्ह विचार मांडेल असं वाटत नाही. अगदी आपल्या शेजारी-पाकिस्तानातही हे घडलं नाही, काल पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन होता, पाकिस्तानची अवस्था सगळ्या जगाला माहिती आहे, पण पंतप्रधान गिलानींच्या भाषणात फक्त आशावाद दिसला. लोकांमध्ये व्यवस्थेबद्दल असंतोष असतोच तो कामातनं दूर करणं जमलं नाही तरी शब्दातून-गोड बोलून त्याकडंचं लक्ष हटवण्यात आपले राजकारणी यशस्वी होत आलेयत. मनमोहनसिंह हे त्याअर्थानं राजकारणी नाहीत म्हणून त्यांना तेही जमलं नसावं, असो.

बोलाचीच कढी?

१५ ऑगस्टच्या या भाषणात सगळ्यात जास्त फुटेज खाल्लं ते भ्रष्टाचारानं. देशात सगळ्याच क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची झळ १२० कोटी जनतेला कधी न कधी बसलेली असतेच; त्याची कबुलीच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन दिली. Continue reading