सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात 9 टप्प्यात मतदान होईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली. त्याची सुरुवात 7 एप्रिलपासून होईल आणि 12 मे रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा संपेल.
मतमोजणी शुक्रवार 16 मे रोजी होणार, म्हणजेच जर त्रिशंकू स्थिती राहिली नाही तर 16 मे रोजी देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल याचं चित्र स्पष्ट होऊ शकतं.
देशाची राजधानी दिल्लीत 10 एप्रिल रोजी तर देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत 24 एप्रिल रोजी मतदान होईल.
महाराष्ट्रात 3 टप्प्यात मतदान होईल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 24 एप्रिल रोजी राज्यात मतदान होईल. या तीनही तारखांना गुरुवार आहे.
पहिल्या टप्प्यात म्हणजे 10 एप्रिलला 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होईल, यात विदर्भातील सर्व म्हणजे 11 जिल्ह्यातील 10 जागांचा समावेश आहे.
Advertisements