एके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा? मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं.. नशीब.
बोलतो जे अर्णव
13