मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो…
छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार. काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची. स्कोरवरुन थोडं बोलणं व्हायचं. क्रिकेटचं वेड असणारी म्हातारी माणसं त्याकाळी विरळच. त्यामुळे त्यांचं आदरयुक्त कौतुक वाटायचं. अशाच एका भेटीत तात्यांनी माझ्या हातात ‘षटकार’ दिला. बहुतेक पहिलाच अंक. त्याच्या मुखपृष्टावर फटाक्याची लड, सुतळी बॉम्ब वगैरे बॅटवर घेतलेला सुनील गावस्करचा मस्त फोटो. ‘षटकार’ आणि ‘क्रिकेट सम्राट’चं व्यसन पुढे बराच काळ टिकलं. षटकारमधे एक बातमी आणि फोटो पाहिल्याचं आठवतंय. Continue reading