टेरर कॅलेंडर

सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाऊन  मिनिटभर शांत उभा राहून आलो. हातात जे होतं त्यातल सोपं म्हणा हवं तर ते काम केलं. मनात अनेक विचार सुरुच होते.

१२० कोटी जनता, १ लाख लोकांमागे फार फार तर १२५ पोलिस…

७,५०० किलोमीटर सागरी किनारा, त्याच्या संरक्षणासाठी फारफार तर १०० पॅट्रोल बोटी..

आणखी किती?

अमेरिकेनं पाच वर्षापूर्वी एका संरक्षण विषयक अहवालात भारताला जगातील सर्वात जास्त अतिरेकीग्रस्त देशात स्थान दिलं होतं, या अहवालानुसार, भारतात २००७ या एका वर्षात वेगवेगळ्या अतिरेकी कारवायांमध्ये प्राण गमवावा लागणाऱ्या नागरिकांची संख्या होती २ हजार ३००…

१९९३ च्या स्फोटांपासून मुंबईवर किमान ८ अतिरेकी हल्ले झाले आहेत, ज्यात शेकडो निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला; हजारो निष्पाप जीवांना त्या जखमा घेऊन कसेबसे जगावं लागतंय. २६ नोव्हेंबरचा हल्ला सोडला तर बाकी प्रत्येक वेळी बाँब ठेवणारे किंवा रिमोट दाबणारे हात; कित्येक दिवस आपल्या आजुबाजुला, याच समाजामधे वावरत होते; अजूनही राहात असतील ही बाब जास्त अस्वस्थ करते. Continue reading

काल रातीला सपान पडलं…

पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो, महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आपली इथे भेट झाली नाही. काही कारणांमुळे अजुनही थोडा वेळ तुमच्याकडून मागून घेत आहे;  तोवर मी स्टार माझासाठी लिहिलेला एक ब्लॉग देत आहे. २००८ मधील मुंबई हल्ल्याच्यावेळी हा ब्लॉग लिहीला होता,  त्यावेळची परिस्थिती कणभरही बदलली नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच.

– – – –

गेले काही ब्लॉग आपली बऱ्यापैकी ओळख झालीय तेव्हा आपल्याच माणसांपासून काय लपवायचं? तुम्ही कोणाला सांगणार नाही अशी खात्रीय मला म्हणून फक्त तुम्हालाच सांगतोय,

 (जानेवारी २००९)

पाकिस्तान घाबरले…

३०-४० मोस्ट वाँटेड अतिरेकी भारताच्या ताब्यात…

Continue reading