घरी निघताना पारावर एक चहाची मैफल ठरलेलीच. आज शैलू परांजपेंची कंपनी लाभली, गप्पांचा ओघ सुरु झाला, आम्ही घडाळ्याकडं पाहायचं सोडून दिलं. म्हटलं नेहेमीप्रमाणेच मिळेल ती गाडी पकडायची. तसंही वेळेचं आणि आपलं गणित फार कमी वेळा जमलंय.
अपेक्षेप्रमाणे उशीर झाला, स्टेशनवर पोचलो, गर्दी वगैरे होतीच. आवडीच्या प्लेलिस्टमधली गाणी सुरु झाली होती. गाडी आली, नेहेमीप्रमाणेच शेवटच्या अर्ध्या डब्यात मी कोंबला गेलो. आजुबाजू-मागेपुढे जिथे जागा मिळेल तिथे कोणीतरी कोणालातरी आपुलकीनं भिडलेले होते. या मुंबापुरीत कोणाला एकटं – मोकळं वगैरे वाटू नये; म्हणून काळजी घ्यायची सुरुवात बहुदा लोकलमध्येच होत असावी. Continue reading