मतदान कुणा करणार?

नाश्कात छगन भुजबळ भेटले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या काळातले किस्से त्यांच्याच तोंडून ऐकताना मजा आली. त्याकाळी निवडणुकीला फक्त  700 ते आठशे रुपये खर्च आला होता हे ऐकताना अंगावर रोमांच आणि शहारे दोन्ही आले होते. आता किती खर्च येतो? या प्रश्नावर भुजबळ साहेबांनी फक्त हात जोडले. मला वाटतं यातच सगळं आलं.  सध्याच्या काळात निवडून येण्यासाठी सगळेच पक्ष, उमेदवार कुठल्या थराला जातात ते आपण पाहतोच. या रणधुमाळीत कोणीही मागे नाही ही शोकांतिका. मतदारही शहाणे झालेत सगळ्यांनाचा हो म्हणतात. हा सगळा एकदिवसाचा खेळ हे त्याच्याही अंगी रुजलंय. Continue reading