इमोशनल फुलांच्या देशा…

आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत.

आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे.

सर्वसामान्य लोकांना बेसिक सुविधा द्यायची ज्यांच्यावर जबाबदारी असते ते सरकार, ती राजकारणी मंडळी वर्षानुवर्षे आपल्याला फाट्यावर मारत असतात. पण वेळ आली की, ‘लोकशाहीत जनताच राजा आहे’ असं नेते म्हणतात, आपण खूश होतो.  प्रत्यक्षात पाच वर्षात एकच दिवस- मतदान यंत्राचं बटन दाबेपर्यंत राजा, बाकी 1825 दिवस कोण कुठला राजा? एक दिवस प्रजासत्ताक, बाकी नेतासत्ताकच.

तिच गोष्ट साखर उद्योगाची. साखर कारखाने म्हणजे राज्यातल्या राजकारणाचा दिंडी दरवाजाच. लाखो शेतकरी आणि हजारो कोटींचा उद्योग. पण ऊसाला दर द्यायची वेळ आली की राजकारण्यांमधला कारखानदार जागा होतो. जास्त दर देणं कसं अवघड आहे यावर त्यांचं चटकन एकमत होतं. Continue reading