2012 in review

हे वर्ष जरा जास्तच लवकर संपलं ना.. कळलंही नाही.

यंदांचा दुष्काळ असेल, त्यामागचं राजकारण असेल, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधे लाजिरवाणा पराभव असेल, द्रविडची  निवृत्ती असेल, आझाद मैदानावरचा हिंसाचार असेल,  बाळासाहेबांचं जाणं असेल की स्वतहाला पुरुष म्हणून घेण्याची लाज वाटायला लावणारा; संतापाचा कडेलोट करणारा दिल्ली गँगरेपचा प्रकार असेल…

या वर्षात बऱ्याच घटना-प्रसंग असे होते की ते तुमच्यासोबत शेअर करावे वाटले होते.. लिहायला सुरुवातही व्हायची पण…

मला वाटायचं शेतीच्या घडामोडीत किती लोकांना इंटरेस्ट असेल? पण यंदाच्या माझ्या टॉप 3 ब्लॉगपैकी एक ठरला गेल्यावर्षी लिहिलेला आफ्रिकेच्या शिंगातला दुष्काळ हा ब्लॉग.  मी यंदाच्या दुष्काळाचं भीषण वास्तव आमच्या कार्यक्रमात दाखवून न थांबता, माझे अनुभव-मत इथेही मांडायला हवं होतं.

आवडलं, भिडलं, वाटलं की लिहिलं पाहिजे ते आळशी स्वभावानं दरवर्षी प्रमाणे यंदाही जमलं नाही..  पश्चातापाचा आता उपयोग नाही मात्र हे टाळणं माझ्याच हातात आहे,  नव्य़ा वर्षात लिखाणात सातत्य आणण्याचा जोरदार प्रयत्न करणार.

माझ्या ब्लॉगसाठी 2012 हे वर्ष कसं गेलं ते वर्डप्रेसनेच दिलंय ते फक्त शेअऱ करतोय. ही ती लिंक 

तुम्ही भरभरुन प्रेम देत आहात, ते कायम राहील याची काळजी मी घेईन.

Here’s an excerpt:

600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 8,500 views in 2012. If every person who reached the top of Mt. Everest viewed this blog, it would have taken 14 years to get that many views.

Click here to see the complete report.