GANGS OF वासेपुर

इन्सान जो है दो नस्ल के होते है, बेवकुफ और हरामी, और ये सारा खेल इन दोनों का ही है…

असं पियुष मिश्रा सुरुवातीलाच सांगतो आणि पुढच्या २ तास ४० मिनिटात प्रत्येक फ्रेममधे तुम्हाला याचा प्रत्यय येईल याची काळजी अनुरागनं घेतली आहे.

कह के लेंगे..

साधारण महिन्याभरापूर्वी, न्यूज रुममधून जात असताना, एका पिलरवरच्या एलसीडीवर स्टार न्यूज (जे नंतर १ जून पासून झालं एबीपी न्यूज, तुम्हाला तर माहितीचंय ) सुरु होतं, ब्रेकमधे एका ट्रेलरनं लक्ष वेधून घेतलं, शेवटी अनुराग कश्यपचं नाव आलं आणि मग गँग्ज ऑफ वासेपूरचं. मग यूट्यूबवर ट्रेलर शांततेत पाहिला, GoW ची वेबसाईटही पाहिली. Continue reading