शेतकऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं

आदर्श प्रकरण अनेकांसाठी इष्टापत्ती ठरलं. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री तर बदललेच सोबत अनेक मंत्र्यांची खातीही बदलली. त्याचवेळी राज्याला नवा कृषीमंत्री मिळाला. राधाकृष्ण विखे पाटलांची कामाची पद्धत आधीच्या कृषीमंत्र्यांपेक्षा वेगळी आहेच, त्याचा सुरुवातीला त्यांना (आणि कृषी विभागाला) त्रासही झाला असणार. महिको मोनसँटोवर बंदीचा अवघड तितकाच धाडसी निर्णय असो किंवा बाजार समित्या सुधारणांसाठी प्रस्थापितांच्या मागे लागणं असो. यात शेती विकास किती आणि राष्ट्रवादीला खिंडीत गाठायचं राजकारण किती असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.  

दुष्काळापासून ते  शेतीतल्या इतर अनेक समस्या आहे तशाच आहेत. दुष्काळावर शाश्वत उपायांसाठी काही ठोस, दूरगामी पावलं त्यांनी उचलली तर महाराष्ट्राच्या शेती इतिहासात वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी अजुनही त्यांच्याकडे आहे.  विखे पाटील गेली दोन-सव्वा दोन वर्ष राज्याच्या शेतीचा कारभार बघतायत. दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं आहे तसंच आहे किंबहुना ते आणखी वाढल्याचं विखे पाटलांना जाणवत असेल का? वेळ कमी आहे आणि अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.  ते कृषीमंत्री झाले त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या राधाकृष्ण विखे पाटलांकडून काय अपेक्षा होत्या ते स्टार माझाच्या ब्लॉगसाठी लिहिले होते. तो पुन्हा इथे देत आहे.  

ओझे अपेक्षांचे शुक्रवारी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात महसूलमंत्रीपदाची बढती स्वीकारत होते आणि  राधाकृष्ण विखे पाटील राज्याच्या कृषीमंत्रीपदाची सूत्रं हाती घेत होते त्याचवेळी जळगावचे दोन शेतकरी अमेरिकेच्या वाटेवर होते. Continue reading