ऊस दरासाठी दरवर्षी आंदोलन का करावं लागतं ?

असा आहे साखर उद्योगाचा पसारा

जगात साखर उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर.  देशातल्या 9 राज्यात, 500 ते 600 साखर कारखाने, तब्बल 60-70 हजार कोटींच्या या साखर उद्योगावर जवळपास 5 कोटी लोक अवलंबून. देशाचं साखर उत्पादन 240 ते 250 लाख टन या रेंजमधे असतं. देशांतर्गत साखरेची मागणी 220 लाख टन. यातली जवळपास 25 ते 30 टक्के म्हणजे अंदाजे 60 लाख टन साखर, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी म्हणजे चॉकलेट वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे उद्योगात वापरली जाते. तर रेस्टॉरंट्स, हलवाई, हॉटेलं, चहाकॉफीची दुकानं वगैरे तेवढीच म्हणजे 60 लाख टन साखर वर्षाला वापरतात. थोडक्यात घरगुती वापरासाठी वापरली जाते 100 लाख टन साखर बाकी उद्योग वापरतात 120 लाख टन साखर.(KPMG report) सर्वसामान्य ग्राहकाला ज्या दरात बाजारातून साखर मिळते त्याच दरात मोठे उद्योगांनाही मिळते. साखर उद्योगापासून सरकारी खजिन्यात किमान तीन ते साडे तीन हजार कोटींचा कर मिळतो.

या आधीची काही आंदोलनं
गेल्या दहाएक वर्षात ऊसदराच्या आंदोलनाशिवाय एकही गाळप हंगाम सुरु झाला नसेल. सध्या यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आघाडीवर आहेत. केंद्र एक टन उसाला जो हमी भाव देतं त्याला FRP (Fair and Remunerative Price) म्हणतात. FRP ही 9.5 टक्के उताऱ्यासाठी असते, Continue reading

नवे भू संपादन विधेयक

भूसंपादन (आणि पुनर्वसन, पुनर्स्थापना) विधेयक लोकसभेत मंजूर झालं.

ग्रामविकास मंत्री जयराम रमेश म्हणजे काँग्रेसने जवळपास सगळ्या पक्षाची सहमती मिळवली. भाजपच्या सुषमा स्वराज यांनी सुचवलेल्या काही महत्वाच्या सुधारणांचा समावेश करत विरोधकांनाही वश करण्यात यश मिळवलं. विधेयकाच्या बाजुने 216 तर विरोधात 19 मत पडली. डावे पक्ष, अण्णा द्रमुक आणि बीजेडीने वॉक आऊट केले तर ममताच्या तृणमुल काँगेसनं विरोधात मतदान केलं. राज्यसभेतही लवकरच हे बील मंजूर होईल.

अन्नसुरक्षा विधेयकाप्रमाणेच काँग्रेसचा आणखी एक महत्वाकांक्षी निर्णय. अन्नसुरक्षा विधेयक सोनिया गांधीचं स्वप्न मानलं गेलं तर भूसंपादन विधेयक राहुल गांधीचं. Continue reading

मतपेटीचा मार्ग गरीबाच्या पोटातून जातो

‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३’  (National Food Security Act) लवकरच देशात लागू होईल. आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणाही होईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हैराण झालेली काँग्रेस आणि युपीए-२ अन्न सुरक्षेकडे ‘गेम चेंजर’ म्हणून पाहात आहे. जगातील दर ८ माणसांमागे १ माणूस रोज उपाशीपोटी झोपतो, त्यात भारताचा वाटा मोठा. जगात जे गरीब आहेत त्यातले २५ टक्के गरीब एकट्या भारतात आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा महत्वाची आहेच.

तात्पुरती अन्न सुरक्षा?

मतपेटीचा मार्ग गरीबाच्या पोटातून जातो हे याआधी अनेकदा सिद्ध झालंय त्यामुळेच काँग्रेसला घाई झालेली आहे. गरीबाच्या एक वेळच्या जेवणाची सोय करायची आणि बदल्यात मिळालंच तर त्याचं मत मिळवायचं असं काँग्रेसचं साधं गणित. स्वार्थ आणि परमार्थ साधण्याची संधी. जगातला पहिलाच कदाचित एकमेव प्रयोग. Continue reading

बाई मी धरण बांधते

“पेरा पेरात साखर त्याचं पिकलं शिवार, घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते “

एकिकडे भीषण दुष्काळ, पाणी टंचाई तर दुसरीकडे याच पाण्यावर ऊस कारखानदारीची सूज; असं राज्यातलं चित्र. या असमतोलावर आणि त्याला कारणीभूत असलेल्या राजकारणावर कधी नव्हे इतकी टिका होतेय, त्याचा फारसा परिणाम होणार नसला तरीही.

याच स्थितीचं वर्णन ‘बलुतं’कार दया पवार यांनी केलं होतं.  ते आठवण्याचं कारण Continue reading

मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर

मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा मला प्रचंड आवडला. त्यानंतर मुन्नाभाई अॅग्रिकल्चर असाच सिक्वल येईल असं वाटत होतं, त्यात शेती शिक्षणातील उणीवांवर हसत हसत बोट ठेवलं जाईल आणि हा उपेक्षित विषय मेन स्ट्रिममध्ये येईल असं स्वप्न पाहात होतो.

तसं वाटायला एक छोटंसं कारण होतं…

या सिनेमात मेडिकल कॉलेज म्हणून जी भव्य वास्तू दाखवलीय ना  Continue reading

शेतकरी नवराच हवा गं बाई!

 एक गाव असतं, त्या गावात औंदा कर्तव्य असलेला एक तरुण शेतकरी असतो, सर्व अविवाहित मुलांप्रमाणेच तो सुद्धा एका सुंदर, सुशील, सर्वगुणसंपन्न वगैरे मुलीच्या शोधात असतो. अट एकच असते की आपल्या होणाऱ्या कारभारणीला शेतीतली सगळी कामं आली पायजेल.

कोण म्हणतंय, शेतकरी नवरा नको गं बाई?

शहराच्या झगमगाटाला कंटाळलेल्या १० तरुणी नेमक्या याच गावात येतात आणि मग या दहाजणींमध्ये सुरु होते त्या शेतकऱ्याचं मन जिंकण्यासाठी चढाओढ. शेतीकामात आपण दुसरीपेक्षा कशा चांगल्या आहोत हे त्या शेतकऱ्याला पटवण्यासाठी या दहा ललना भरपूर मेहनत घेतात. ट्रॅक्टर चालवतात, कोंबड्यांना खायला घालतात, गाईम्हशीचं दूध काढतात,  पार तबेल्यात गवतावर रात्र झोपून/जागून काढतात, थोडक्यात, काही करायचं बाकी ठेवत नाहीत. (थोडा अंदाज फोटोवरुन येईलच) शेवटी यातली जी शेतावर प्रेम करते असं त्याला वाटतं तिला तो शेतकरी आपली बायको म्हणून निवडतो आणि (बहुदा) ते सुखाने संसारही करत असावेत.

हे गाव, हा किस्सा अर्थातच आपल्या देशातला नाहीय.

ऑस्ट्रेलियातला हिट्ट रियॅलिटी शो

हे सगळं घडतंय युरोपात एका रियॅलिटी शो मध्ये…

ऑस्ट्रेलियातल्या चॅनेल नाईनवर  FARMER WANTS A WIFE हा रियॅलिटी शो गेली १० वर्ष सुरु आहे. अमेरिकेसह, युरोपातल्या अनेक देशातही हा शो सुरु आहे.

अमेरिकेत १ शेतकरी दहा ललना आहेत, तर ऑस्ट्रेलियात शेतकरी आणि मुलींच्या सहा जोड्या आहेत. प्रत्येक देशानं आपल्या प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत फॉरमॅट मध्ये बदल केलाय. शेतकऱ्याचा तो तरुण पोऱ्या, त्या सुंदऱ्यांपैकी एखादीला ट्रॅक्टरवर आपल्या मिठीत घेतं असतो तेव्हा गाव आणि शहरातलं अंतर लुप्त होतंय अशी कल्पना करत तिथले आबालवृद्ध सुखावले नसते तरच नवल. प्रेक्षकांना या शो नं अक्षरश: खिळवून ठेवलंय.

अमेरिकेत या शो साठी शेतकरी निवडताना कृषी विभागाकडून म्हणजेच USDA कडून त्या शेतकऱ्याच्या शेतीकामाची कुंडलीच मागवली जाते, मॅट न्यूस्टॅट ला तुम्ही पाहिलंत तर तो शेतकरी आहे यावर विश्वास बसणार नाही, त्याच्याकडे १६०० एकर शेती आहे, त्याच्या परिवाराला १९९५ ते २००६ या काळात अनुदान, नुकसान भरपाई, मदत वगैरे मिळून ७ लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे साडे तीन कोटी रुपये मिळाल्याचं कळलं आणि मला आपला शेतकरी, अनुदान, पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे गोष्टी आठवल्या, असो.

असं भारतातही होईल?

 खरं तर, शेतकरी नवराच हवा गं बाई असा कार्यक्रम तथाकथित शेतीप्रधान भारत देशात सुरु करायला भरपूर स्कोप होता. चॅनल्सना मसाला, टिआरपी मिळाला असता, प्रेक्षकांना आयतं मनोरंजन आणि कुणी सांगावं शेतकऱ्याच्या पोरायल्ना जीवनसाथीही मिळाली असती.

 या शो ची नक्कल भारतीय टेलिव्हिजनवर दिसली खरी पण त्यात शेतकरी दिसला नाही तर राहुल महाजन, राखी सावंत अशी पात्र दिसली.

रियॅलिटी शो असला म्हणून काय झालं, शेतावरची मेहनतीची काम करायला कोण शहरातली पोरगी तयार होईल? आपल्या शेतकऱ्याची-समाजाची अवस्था चॅनेलवाल्यांनाही चांगली माहिती आहे, काय विकलं जातं हेही त्यांना बरोब्बर समजलंय. जगभरात शेतकऱ्याच्या नावानं गाजत असलेल्या या रियॅलिटी शोची आपल्याकडे कॉपी करताना त्यातून शेतकरी गायब होतो तो त्यामुळेच.

या कन्सेप्टमध्ये बदल करुन शेतकऱ्याच्या जीवनाची रियॅलिटी कधी तरी पडद्यावर आणायला वाव आहेच. बाकी आपल्याला पचतील-रुचतील असे बदल करुन, भविष्यात- २०-२५ वर्षात कधीतरी FARMER WANTS A WIFE किंवा शेतकरी नवराच हवा गं बाई असं वाक्य भारतातल्या टिव्ही शोमध्ये जरी ऐकायला मिळालं तरी भरुन पावलं म्हणायचं.

वदनी कवळ घेता remixed

जेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक लहानपणी कानावर पडायचाच, बहुतेक शाळांमध्ये म्हणावा लागायचा…

माझ्या thank you शेतकरी दादा ब्लॉगच्या निमित्ताने बोलताना प्रसन्न जोशीने,

वदनी कवळ घेताच्या या दुसऱ्या/ improvised version ची  पुन्हा भेट घडवून आणली. 

यात शेतकरी कामगाराप्रती ऋण व्यक्त करण्याची भावना ठळकपणे जाणवते.

तुम्हालाही आवडेल…

वदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे

कृषीवल कृषीकर्मी, राबती दिन रात

श्रमीक श्रम करोनी, वस्तू त्या निर्मितात

स्मरण करून त्यांचे, अन्न सेवा खुशाल

उदर भरण व्हावे, चित्त होण्या विशाल!!

 

जेवणाच्या आधी हे म्हणायला, किमान आठवायला काय हरकत आहे.