एटीएमचं जाळं वाढेल?

देशात एकूण किती ATMs आहेत?   

२ लाख १५ हजार ३९

देशात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?

 

बँक एटीएमची संख्या
SBI ४९ हजार ६६९
ICICI १४ हजार ७३
AXIS १२ हजार ८७१
HDFC १२ हजार १३

 

देशात कोणत्या भागात किती एटीएम?

 

महानगर शहरी भाग निम शहरी ग्रामीण   एकूण
५५९६० ६०३०१ ५८४३३ ४०३४५ २,१५, ०३९

(स्त्रोत – आरबीआय, जून २०१६)

 

महाराष्ट्रात एकूण किती ATMs आहेत?   

२४ हजार ८२९

 महाराष्ट्रात सर्वात जास्त एटीएम कोणत्या बँकेचे?

 

बँक एटीएमची संख्या
SBI ४ हजार २२२
ICICI २ हजार ७०३
AXIS १ हजार ९०९
HDFC २ हजार १३

sbi.jpg

देशात सर्वाधिक एटीएम महाराष्ट्रात आहेत, त्या खालोखाल तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकचा नंबर.

सर्वात कमी एटीएम (१५४) मिझोरम राज्यात आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत ९ हजार ७० एटीएम आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये ११ हजार ६२५ एटीएम आहेत.

एटीएमची संख्या जास्त असलेली ५ राज्य

 

महाराष्ट्र तामिळनाडू उत्तरप्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल
२४,८२९ २३,७२८ १९,१४३ १६,९२९ ११,६८०

 

ग्रामीण भागात स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वाधिक म्हणजे ७,९३९ एटीएम आहेत. त्याखालोखाल टाटा कम्यूनिकेशन पेमेंट सोल्यूशन्स या White Label ATMs (WLA) चा नंबर लागतो.

ग्रामीण भारतात टाटाचे तब्बल ३,२१२ व्हाईट लेबल एटीएम आहेत. बँकिग सुविधेपासून वंचित, उपेक्षित असलेल्या ग्रामीण भागात एटीएमची सुविधा व्हावी म्हणून बिगर बँकिंग संस्थांना (Non Banking Finance Corporation) सरकारने विशेष परवानगी दिली होती. अशा जवळपास १४ हजार व्हाईट लेबल एटीएम पैकी ६ हजार WLA  आज ग्रामीण भारतात कार्यरत आहेत.

 ग्रामीण भारतात सर्वाधिक एटीएम या ५ बँकांची

एस.बी.आय टाटा (WLA) पी एन बी  बँक ऑफ बडोदा बि.टी.आय (WLA) 
७,९३९ ३,२१२ २७१५ २,२४५ २,०२८

 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात दर एक लाख लोकसंख्येमागे फक्त १८ एटीएम आहेत. जगाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. चीनमध्ये २२४, ऑस्ट्रेलियात १६० तर अमेरिकेत १२९ एटीएम आहेत. एटीएमचं महत्व आपल्याला कळत असेल तर हा नोटाबंदीच्या निर्णयाचा असाही फायदा म्हणावा लागेल.

1 thought on “एटीएमचं जाळं वाढेल?

  1. एटीएम च्या बाहेर लागलेल्या रांगा पाहता देशात अजून एटीएम असणं अपरिहार्य आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s