सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात 9 टप्प्यात मतदान होईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली. त्याची सुरुवात 7 एप्रिलपासून होईल आणि 12 मे रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा संपेल.
मतमोजणी शुक्रवार 16 मे रोजी होणार, म्हणजेच जर त्रिशंकू स्थिती राहिली नाही तर 16 मे रोजी देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल याचं चित्र स्पष्ट होऊ शकतं.
देशाची राजधानी दिल्लीत 10 एप्रिल रोजी तर देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत 24 एप्रिल रोजी मतदान होईल.
महाराष्ट्रात 3 टप्प्यात मतदान होईल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 24 एप्रिल रोजी राज्यात मतदान होईल. या तीनही तारखांना गुरुवार आहे.
पहिल्या टप्प्यात म्हणजे 10 एप्रिलला 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होईल, यात विदर्भातील सर्व म्हणजे 11 जिल्ह्यातील 10 जागांचा समावेश आहे.
10 एपिल (गुरुवार)-
1. बुलडाणा, 2. अकोला, 3.अमरावती, 4.वर्धा, 5. रामटेक, 6. नागपूर, 7. भंडारा-गोंदिया, 8. गडचिरोली, 9. चंद्रपूर, 10. यवतमाळ-वाशिम
त्यानंतर 17 एप्रिल रोजी 19 लोकसभा मतदारसंघांत मतदान होईल, यात मराठवाड्यातील 6, पश्चिम महाराष्ट्रातील 12 आणि कोकणातील एका मतदारसंघाचा समावेश आहे.
17 एपिल (गुरुवार)-
11. हिंगोली, 12. नांदेड, 13. परभणी, 14. मावळ, 15. पुणे, 16. बारामती, 17. शिरुर, 18. अहमदनगर, 19. शिर्डी, 20. बीड, 21. उस्मानाबाद, 22. लातूर, 23. सोलापूर, 24. माढा, 25. सांगली, 26. सातारा, 27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, 28. कोल्हापूर,29. हातकणंगले
राज्यातील तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात उरलेल्या 19 लोकसभा मतदारसंघांत मतदान होईल, ज्यात उत्तर महाराष्ट्रातील 6, मराठवाड्यातील 2, कोकणातील 1, मुंबईतील 6, आणि ठाण्यातील 4 जागांचा समावेश असेल
24 एप्रिल (गुरुवार)-
30. नंदूरबार, 31. धुळे, 32. जळगाव, 33. रावेर, 34. जालना, 35. औरंगाबाद, 36. दिंडोरी, 37. नाशिक, 38. पालघर, 39. भिवंडी, 40. कल्याण, 41. ठाणे , 42. रायगड 43. उत्तर मुंबई, 44. ईशान्य मुंबई, 45. वायव्य मुंबई, 46. उत्तर मध्य मुंबई, 47. दक्षिण मध्य मुंबई, 48. दक्षिण मुंबई
नरेंद्र मोदींच्या आक्रमक कँपेनला यश येणार की राहुल गांधीचा युवा जोश तरुणाईला भूरळ घालणार? अरविंद केजरीवाल भाजपचा वारु रोखणार की नितिशकुमार, ममता, जयललिताची केद्रात चालणार? राज्यात मनसेचं काय होणार किंवा मनसेमुळे महायुतीचं काय होणार अशा अनेक प्रश्नाची उत्तरं आजपासून 72 दिवसांनी मिळणार. 72 दिवस मतदार म्हणजे तुम्ही आम्ही राजा वगैरे असणार आहोत..
’72 दिन…72 दिन है तुम्हारे पास, अगर बिना सोचे व्होट करोगे तो ये 72 दिन तो क्या अगले 5 सांल खुदा भी तुम्हे नही बचा सकता’ 🙂
So Choose wisely… आश्वासनाला- प्रलोभनाला बळी न पडता.. विचार करुन मतदानाचा हक्क वापरा..