राहुलगिरी

भारतीय उद्योग महासंघ म्हणजेच CII च्या परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण झालं.

इतक्या मोठ्या आणि अनेक अर्थानं महत्वाच्या प्लॅटफॉर्मवर आपली मतं मांडण्याची त्यांची ही पहिलीच वेळ.

काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या गोरखपूर- मुंबई ट्रेन प्रवासातील अनुभवांनी भाषणाची सुरुवात केली. सुतारकाम करुन पोट भरायला मुंबईकडे येणाऱ्या गिरीशचा किस्साही त्यांनी सांगितला.

थोडक्यात तो किस्सा असा :-

आणखी एक संधी... गमावलेली
I spoke to a young Muslim boy; setting out to start his new life. He had no idea what work he is going to do. I asked him, BOSS; what happens if you reach Mumbai and there is nothing for you to do?

If I reach Mumbai & there is nothing to do, I will get into the train and go to Bangalore.

That’s the spirit of this country… forward moving…BRAVE.

What stuck me about that train was the optimism. These were poor people, weak people but not one of them was pessimist. They were seating there saying; हां भैय्या, काम हो जायेगा, नोकरी मिल जायेगी.

And they were all struggling & this optimism for me is just like INDIA.  Its bursting with dreams & fearless ideas; brave ideas.

As it hurtles towards Mumbai, I sat there looking at this train & wondering, how many of these dreams will actually be fulfilled. By the time we reach Mumbai weve made friends with Girish; The carpenter and he told us come & see where I live & we thought that’s an interesting thing to do. We had come all the way from Gorakhpur & we thought Lets see what’s this young migrant is doing?

4’O clock in the morning; walk of into the gallis of Bombay; monsoon season…We’ve feet going into puddles. Then he opens the door. Little room, probably double the size of this table. 6 people sleeping inside, they get up, all of them are migrants. All of them have done little journey. All of them have that dream. We had a little chat, they are smart fellow entrepreneur like all of you; except they had empty pockets, & he says come to the चायवाला, we go to the चायवाला.

There is 5-6 of us & he buys us all tea & he insists, नही मै तो खरीदुंगा.

That is the spirit of this country. Millions & Millions & Millions of youngsters struggling everyday with optimism& this story of GIRISH exemplifies the idea of empowerment’ it exemplifies the Indian worker, the Indian entrepreneur etc etc.  

या किस्स्यातून त्यांना नेमकं काय म्हणायचंय तेच कळलं नाही. गावाकडे रोजगाराची संधी नाही, त्यामुळे लोक घरदार मागे सोडून हजारो किलोमीटर दूर मुबईंत येतात, इथं छोट्याशा खोलीत 6-6, 7-7 जण एकत्र राहतात, याला स्पिरिट म्हणायचं की मजबुरी? इथल्या अनिश्चिततेला सामोरं जाण्याची वेळ या तरुण पिढीवर का येते याचा विचार कोण करणार?  भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधींचं नाव पुढं केलं जातंय त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतचा रोड मॅप ते उद्योगपतींसमोर ठेवतील अशी आशा होती. प्रत्यक्षात त्यांचा सूर किती निराशाजनक होता.

ते म्हणाले, “एक व्यक्ती लाखों की मुश्किले हल नही कर सकता”.

नेता एवढा निराशावादी कसा असू शकतो?  मोठ्या बदलाची सुरुवात नेहेमी एका व्यक्तीपासूनच झालेलीय. शिवाजी महाराज असोत बाबासाहेब आंबेडकर असोत की महात्मा गांधी, यांसारख्या काही लोकांनी निराशेचा सूर लावला असता तर आज जे काही स्वातंत्र्य आपण उपभोगतोय तेवढंही मिळालं नसतं. 3-4 पिढ्या सत्ता घरात असल्यामुळे राहुल गांधीना याचा विसर पडलेला दिसतोय.

Girish- The carpenter सारखंचं 2008 साली संसदेत शेतकरी आत्महत्यांबाबत झालेल्या भाषणातही राहुल गांधींनी शेतकरी विधवा कलावतीचा उल्लेख केला होता. अशी उदाहरणं शेकड्यानं देता येतील, ती काही भूषणावह नाहीयत. उलट आजच्या परिस्थितीचं, दूरदृष्टीच्या अभावाचं, सरकारी पातळीवर फसलेल्या नियोजनाचं अस्वस्थ करणारं वास्तव आहे ते.  गेली काही वर्ष राहुल गांधी  सिस्टममधील अनेक गोष्टींवर टिका करतात. त्यात प्रामाणिकपणा असतोही, पण ज्यानं उत्तर द्यायची त्यांनीच जाब विचारायचा असा हा प्रकार वाटतो.

काही मुद्दे ऐकायला चांगले होते ते नेटवर इतरत्र वाचायला मिळतीलच पण ओव्हर ऑल, देशातील उद्योगपतींसमोर आपलं व्हिजन मांडायची चांगली संधी राहुल गांधींनी आज गमावली असं मला वाटतं. राहुल गांधीं काय बोलतात याकडे युवापिढी दुर्लक्ष करेलही कदाचित, पण ते काय करतात याकडे मात्र गिरीशसारख्या तरुणांचं, तमाम जनतेचं आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचंही लक्ष राहिल.

1 thought on “राहुलगिरी

  1. खरी चूक CII ची आहे त्यांनी काय म्हणून राहुल गांधी ला बोलावलं…. राहुल गांधी ने कोणती जबाबदारी अजून पार पाडली आहे ??… कोणते मंत्रिपद खाते यशस्वी सांभाळले आहे ?? कोणता मोठा निर्णंय घ्यायला सरकार ला भाग पाडलं आहे ?? कोणता प्रयोग यशस्वी केला आहे ?? हल्लीच पक्षाचं उपाध्यक्ष पद घेतलं आहे …. काही अनुभव आहे का ?? अश्या माणसाकडून कोणत्या विचारांची ते अपेक्षा ठेवत होते ?? काल भारतातले सगळ्यात मोठे अर्थ तज्ञ आणि आपले पंतप्रधान हतबल दिसत होते तिथे ह्याच काय घेवून बसला आहात ??

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s