इन्सान जो है दो नस्ल के होते है, बेवकुफ और हरामी, और ये सारा खेल इन दोनों का ही है…
असं पियुष मिश्रा सुरुवातीलाच सांगतो आणि पुढच्या २ तास ४० मिनिटात प्रत्येक फ्रेममधे तुम्हाला याचा प्रत्यय येईल याची काळजी अनुरागनं घेतली आहे.
साधारण महिन्याभरापूर्वी, न्यूज रुममधून जात असताना, एका पिलरवरच्या एलसीडीवर स्टार न्यूज (जे नंतर १ जून पासून झालं एबीपी न्यूज, तुम्हाला तर माहितीचंय ) सुरु होतं, ब्रेकमधे एका ट्रेलरनं लक्ष वेधून घेतलं, शेवटी अनुराग कश्यपचं नाव आलं आणि मग गँग्ज ऑफ वासेपूरचं. मग यूट्यूबवर ट्रेलर शांततेत पाहिला, GoW ची वेबसाईटही पाहिली.
कोळसा खाणीत होणारे स्फोट दाखवणारा लाँग शॉट, हमरे जिंदगी का एक्कही मकसद है, बदला… असं म्हणणारा मनोज वाजपेयी, रिमा सेनला पाठमोरा टिपणारा कॅमेरा, इ वासेपूर है यहाँ परिन्दा भी एक पंख से उडता है दुसरे से अपना इज्जत बचाता है असं सांगणारा पंकज, किंवा साले के मुं में तार डाल के गांडसे निकाल के इसी प्लॉट पे पंतग ना उडाई तो नाम नही लेना म्हणणारा तिग्मांशू असो किंवा ‘कह के लेंगे साले की’ असले शुद्ध डॉयलॉग्ज. आय अॅम अ हंटरचा ऱ्हिदम असो की वुमनियातला ठेका. जिया हो बिहार के लाला असो की अमित – स्नेहाचं अंगावर येणारं कह के लुंगा… तिथंच ठरवलं हा पिक्चर पहिल्याच दिवशी फर्स्ट डे ‘फर्स्ट’ शो पाहायचाच. बच्चनच्या अग्निपथनंतर असा योग पहिल्यांदाच जुळून येत होता.
एक महिना गेला. २२ जून उजाडला. सकाळीच मेघराज पाटील, माणिक मुंढेला एसेमस केला, कुणी येवो न येवो आपण जायचंच हे ठरवल्यामुळे ९.२० ला घरातून बाहेर पडलो. फार गर्दी नव्हती. मोस्टली तरुण मुलं, काहींच्या सोबत तरुण्यांचाच भरणा होता. तिथं सर्वात वयस्कर मीच आहे असा फिल येवू नये म्हणूनच की काय एक काका-काकूही होते. पिक्चरच्या टॉकिजमधे जन गण मन दाखवून काय साध्य होतं मला न उलगडलेलं कोडं आहे, माझ्यासहीत तिथं जमलेल्या सर्वांची राष्ट्रभक्ती सिद्ध झाली आणि थोड्याच वेळात पिक्चर सुरु झाला.
सुरुवात टिपिकल अनुराग कश्यपी आहे, दुसऱ्याच मिनिटाला तो तुम्हाला खुर्चीत सावरुन बसायला लावतो आणि जे उशीरा आलेत त्यांना जागेवरच उभा राहायला किंवा लवकर सीट शोधून जागेवर बसायला बाध्य करतो.
गँग्स ऑफ वासेपूर खतरनाक आहे, मनोज वाजपेयीनं अपेक्षेप्रमाणेच काम केलंय. बदला घेणं हाच उद्देश, स्त्रीलंपटपणा म्हणा किंवा ‘मरदोंवालं’ वागणं, मुलाच्या काळजीतला बाप, एकाच वेळी हिंसक आणि कॉमिक भाव देणारा सरदार खान त्यानं सॉलिड उभा केलाय. नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी वगैरे मस्तच आहेत, रिमा सेनला आय व्हिटॅमिनसाठीच घेतलंय. पियुष मिश्रा हा माणूसच जबराट आहे, इक बगल में चांद होगा इक बगल में रोटींया सिंपली बेस्ट. मला सर्वात जास्त आवडला तो तिग्मांशू धुलियाचा रामाधीर सिंग. साहिब बीवी और गँगस्टर तसंच पानसिंग तोमर सारखे पिक्चर देणारा हा डायरेक्टर इथं अभिनेता म्हणून भाव खाऊन जातो.
त्यासोबतच माझ्यासाठी सरप्राईज पॅकेज होतं नग्मा खातून जिवंत करणारी रिचा चढ्ढा. नव विवाहिता, नवऱ्याच्या बाहेरख्यालीमुळे परेशान असलेली पण तरीही त्याच्यावर प्रेम करणारी, बाहेरच्या बाईसमोर नवऱ्याची ‘इज्जत’ जावू नये; ‘ताकद’ मिळावी म्हणून आग्रहानं त्याला खाऊ घालणारी, कोयता घेऊन पोलिसांची वाट अडवणारी, पोरांची काळजी घेणारी अशी नग्मा खातूनची रुपं तिनं ताकदीनं उभी केलीय. असा रोल/अशा स्त्री भूमिका आजकाल फार कमी पाहायला मिळतात हिंदीत. गुलालमधला आयेशा मोहनचा रोल असाच स्ट्राँग होता… रिचानं प्रचंड इम्प्रेस केलं. स्नेहा खानवलकरचं संगीत आणि राजीव रवीचा कॅमेरा केवळ अप्रतिम.
हिंदी सिनेमात शिव्या आणि सेक्सचा वापर खुपच लाजत लाजत, कृत्रिमपणे केला गेलाय पण गँग्ज ऑफ वासेपूरमधे दोन्हींचा मस्त -नैसर्गिक वापर केलाय. निकाह, बॉम्बे किंवा मकबूलसारखे काही अपवाद सोडले तर मुस्लिम समाजाचं असं प्रतिबिंबही हिंदीत दिसलं नाही. 1940 ते 2004 अशी 7 दशकं दाखवणं अवघड काम आहे पणAnurag dared to be different as usual.
इक बगल मे चांद होगा, वुमनिया आणि आय अॅम अ हंटर सोडलं तर गाणे वापरले नसते तरी चाललं असतं इनफॅक्ट गाणी नसती टाकली सिनेमात तरी चाललं असतं आणि अनुराग ती रिस्क घेऊ शकला असता असं माझं मत, दुसरं म्हणजे बिहारमधला एखादा आमदार-मंत्री, सरदार खानला इतकं सहन करत यावर कधीकधी विश्वास ठेवावा असं वाटत नाही. हे दोन मुद्दे चित्रपटाला दृष्ट लागू नये म्हणून किंवा टिकेला वाव राहावा म्हणून आहेत असं मी समजतो.
बाकी चित्रपट समीक्षा हा माझा प्रांत नाही पण काय करणार, अनुराग कश्यपने कह के ले लिया 🙂
शेवटी एक सूचना – सुरुवात चुकवू नका आणि शेवटपर्यंत बसून राहा म्हणजे अगदी शेवटची नावं संपायला आली तरी हलू नका थेटरातून… नावं संपत आली… झाडायला पोरं आली तरी आम्ही आणि माझ्यासारखेच च्युतिये वाटणारे 3, असे मोजून 5 जण होतो…त्यांनीही माझ्यासारखाच अनुरागचा ट्विट वाचला असेल…
सगळी नावं संपल्यावर वासेपूर पार्ट २ चा ट्रेलर आहे तो ही जबराटंय. नवाजुद्दीन खाऊन टाकेल असं वाटतं. मी तर पक्का जाणार आहेच, तुम्ही?
व्वा..अगदी रामदासी स्टाइलचा रिव्हू…:)
आजारी असल्यामुळे अजून सिनेमा पाहाता आला नाही..पण आता येत्या सुट्टीच्या दिवशी नक्की पाहाणार..:)
🙂 धन्यवाद, तू कायम फिट अँड फाइन राहावं आणि असे सिनेमे पाहायला उशीर होऊ नये अशी परमेश्वराला/ निर्मिकाला प्रार्थना 😛
AB KAHKE DEKHUNGA,.ANURAG IS GREAT
मस्त… बघायला हवा एकदा (थिएटरमध्ये जाऊन (हे तुम्ही लिहू नये म्हणून मीच लिहीलं) 🙂 )
लवकर बघ, (काहीतरी लिहायला हवं म्हणून लिहिलं) 🙂
संदीप तूझी समिक्षा वाचल्यावर…सिनेमा पहावा असं वाटतय आता… खूपचं सुक्ष्म निरिक्षण केलंय.. म्हणा.. आनंद घेतलास तू….हे कळतंय….क्षणो..क्षणी…
आनंद तर खरंच घेतला सर. कधी जाताय मग, उशीर करु नका 🙂
काही सिनेमे हे दिग्दर्शकासाठी पहावयाचे असतात.
कारण उत्कृष्ट पटकथा व त्यास न्याय देणारे कलावंत ह्यांची उत्तम भेळ करून उत्कृष्ट सिनेमा पहावयास मिळणार ह्याची खात्री असते.
कश्यप त्याच गटात मोडतात.
आणि बांधेसूद ,आकर्षक समिक्षा वाचल्यावर तर सदर सिनेमा नक्कीच पहिल्या जाणार.
खरं आहे निनाद, आणि इथे दिग्दर्शक, कथा, कलाकार, तंत्रज्ञ, सगळंच दणकट आहे. सिनेमा पाहिला जाईल पण फक्त गल्ल्याचा विचार केला तर A सर्टिफिकेटमुळे थोडी अडचण राहिलंच, अर्थात असा विचार सर्वसामान्यांसाठी :-), धन्यवाद
nice
Awesome…. Thats i called a DESCRIPTION
धन्यवाद सागर, आज जाणारैस ना पिक्चरला? 🙂