CHANGE IS GOOD

स्टार माझा चॅनलचं नाव एबीपी माझा असं बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा कळला तेव्हा फार रुचला नाही.

कोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनाची आणि कोणाचीच तयारी नसते हे एक कारण,

तर ‘स्टार’ जाणार आणि त्याची जागा एबीपी अशी अजुन तोंडात न रुळलेली अक्षरं घेणार हे दुसरं.

खरं तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात -घराघरात मनावर कोरल्या गेलेलं, आपलं वाटणारं ‘स्टार माझा’ हे नाव ज्यावेळी पक्कं झालं त्यावेळीही आम्हा सर्वांना, ‘माझा’ काय चॅनलचं नावंय का? असंच वाटलं होतं. थोड्या फार फरकानं आताही तीच गत आहे. आज एबीपी माझा हे नाव सोशल नेटवर्किंग साईट्सवर गेलं आणि सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे…

ABP म्हणजे काय?

एबीपी म्हणजे आनंद बाजार पत्रिका.

हा भारतातला एक मोठ्ठा वृत्तपत्र समूह आहे. 

साधारण ९० वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये चार पानी सांयदैनिक म्हणून आनंद बाजार पत्रिकेची सुरुवात झाली. २ पैशाला मिळणारं या दैनिकाचा खप होता दररोज १ हजार. आज ९० वर्षांनंतर  आनंद बाजार पत्रिका राज्यात सर्वाधिक खपाचे दैनिक आहे, दररोज ७० लाख वाचकांच्या हातात पोचते.

आज एबीपी ग्रुप देशातल्या महत्वाच्या मीडिया हाऊसेस पैकी एक आहे. आणि पत्रकारितेसह वेगवेगळ्या क्षेत्रात एबीपीनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

एबीपीचं नाव बातमीदारीत एकदम विश्वासार्ह मानलं जातं.

न्यूज मीडियात २६ टक्के परकिय गुंतवणूकीला परवानगी मिळाली त्यावेळी मीडिया मुगल रुपर्ट मर्डॉक यांचा स्टार आणि अवीक सरकारच्या एबीपीनं एकत्र येत २००३ साली MCCS (Media Content & Communications Services India (Pvt) Ltd.) नावाची कंपनी स्थापन केली.  एमसीसीएस मध्ये एबीपीचा वाटा ७४ टक्के तर स्टारचा २६ टक्के वाटा होता.  आधी हिंदीत स्टार न्यूज, मग बांग्लात स्टार आनंदो आणि २००७ मध्ये स्टार माझा सुरु झालं. अल्पावधीतच या २४ तास न्यूज चॅनल्सनी आपल्या धडाकेबाज, दर्जेदार पत्रकारितेच्या जोरावर आपापल्या राज्यात प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मिळवलं.

आज ना उद्या स्टार आणि एबीपी फारकत घेणार होतेच. त्यात जगभरात रुपर्ट मरडॉक यांच्या मालकीच्या काही वृत्तपत्रांबाबत बातमी मिळवण्याच्या पद्धतीवरुन मोठं वादंग निर्माण झालं, अगदी मरडॉक पितापुत्रांना पहिल्यांदाच लोकांसमोर आणि ब्रिटन पार्लमेंटसमोर स्पष्टीकरण द्यावं लागलं. अर्थात त्याचा भारतातल्या घडामोडींशी फार संबंध नसावा. पण अखेर तो दिवस उजाडला आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

एक म्यान मे दो तलवारे ९ वर्ष राहिल्या हेच आश्चर्य.

आता स्टार माझा – एबीपी माझा, स्टार न्यूज – एबीपी न्यूज तर स्टार आनंदा – एबीपी आनंदा या नावानं ओळखले जातील.

एमसीसीएस जिवंत असली तरी स्टारचे २६ टक्के शेअर एबीपीनं विकत घेतल्याचं बोललं जातंय. आता हे तिन्ही चॅनेल्स १०० टक्के भारतीय कंपनीच्या हातात असतील. स्टार येत्या वर्ष सहा महिन्यात नवा भारतीय पार्टनर शोधून पुन्हा मैदानात उतरेल अशीही चर्चा सुरु आहे.

एबीपी माझापुरतं बोलायचं झाल्यास २००७ पासून आजपर्यंत म्हणजे गेल्या ५ वर्षात माझानं दमदार पत्रकारितेच्या जोरावर आणि देव माझा, घे भरारी, ढॅणट्ढॅण, पैसा झाला मोठा, खेळ माझा, मुलांच्या विश्वात अशा कुटुंबातील सर्वांची गरज भागवणारे तसंच सातबाराच्या बातम्यांसारख्या शेतीक्षेत्रासाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांच्या जोरावर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. 5 वर्षातले काही आठवडे सो़डल्यास टिआरपीच्या खेळातही माझा सातत्याने नंबर वन राहिले आहे.  नाव बदललं असलं तर प्रेक्षकांच्या मनातलं स्थान बदलणार नाहीय याची खात्री.

एबीपी माझाचे पडद्यावरचे आणि पडद्यामागे काम करणारे हात आणि डोकं तेच असणार आहे; त्यामुळे बातम्यांचा वेग आणि दर्जा तोच असेल, किंबहूना एबीपीचा इतिहास बघता ‘माझा’ आणखी दर्जेदार आणि कंटेन्ट फुल्ल होईल अशी आशा करायलाही हरकत नाही कारण

फक्त नाव बदललंय…

40 thoughts on “CHANGE IS GOOD

 1. hardik shubhechha. Amhala hi wahini awadte ani nav badale tari avdatach rahil.(Navat kay Ahe ?)

 2. संपूर्ण स्वदेशी चानल चे स्वागत !!!…best of luck..!!

 3. १०० % भारतीय जबाबदारी येऊन पडलीये खांद्यांवर… कायद्याने होणार्या अन्यायाला वाचा फोडा…!

 4. संपूर्ण स्वदेशी झाल्या बद्दल आनंद बाझार पत्रीकाचे हार्दीक अभिनंदन !

  • एबीपी ग्रुपचं सानंदा नावाचं चॅनल अलिकडेच सुरु झालं आहे पण ते एन्टरटेन्मेंट चॅनल आहे, तर एबीपी आनंदा (आधीचे स्टार आनंदा) ही 24 तास बंगाली वृत्तवाहिनी आहे. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद राजेंद्रजी

 5. All the best. Tumache sagale Batamidar (vishetaha field var janare) shuddha Marathi bhasha vapartil ashi thodi kalaji ghyavi hi ek suchana. Tyamule channel chi pat aanakhi wadhel.

  • डॉक्टरसाहेब, सुचना चांगली आहे, माझाचे फिल्डवर काम करणारे पत्रकार किंवा हेडक्वार्टरला काम करणारे आम्ही, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलो आहोत, त्यामुळे तो फरक राहील असं वाटतं, तुम्हाला अपेक्षित शुद्ध मराठी भाषा आली तर नक्कीच सर्वांचाच फायदा होईल. आपली सूचना सहकारी आणि वरिष्ठांपर्यंत पोचवतो. धन्यवाद.

 6. mala tar as vatat hota ki ABP mhanje ” amitabh bachchan production “…….
  thks for this information.

 7. i dont know…but a bengali media house will run “assal” marathi batami channel..cant get it thru….wat a eastern cost will know abt western culture ,beauty values…

  • Little to do with region i guess. see for example; few years back Ramoji Rao gave new life to Marathi news with E.TV. Marathi; same with ABP, as a 76% partner in STAR MAJHA they already proved it since last 5 years. ABP MAJHA’s STAFF/ employees are the SAME; they are from different parts of Maharashtra and knows essence of soil very well; so rest assure. Thanks for feedback.

  • खरंय विनोद, ‘स्टार’ ची सवय झाल्यामुळे तसं होणं स्वाभाविक आहे. एबीपी माझा हे ही तोंडात रुळेल अशी आशा. प्रतिक्रिया कळवत राहा. धन्यवाद

 8. सगळा खुलासा वाचला तेंव्हा सगळे समजले नाहीतर आधी वाटले स्टारमाझा ला अखिल भारतीय परिषदेने घेतले की काय ? आनंद बजार पत्रिका एकदम बेस्ट …जसे महाराष्ट्र मध्ये सकाळ व त्यांचे साम टी.व्ही.वाहिनी ……

  • थेट तशी तुलना होणार नाही, कारण वृत्तपत्र म्हणून एबीपी आणि न्यूज चॅनल म्हणून माझा चं काम एकदम वेगळं आणि कदाचित मोठं आहे. पण लक्षात येण्यासाठी थोडक्यात आपण म्हणताय ते बरोबर आहे.

  • वेलकम संजिवनी, जवळपास 20-25 दिवसांपासून हा ब्लॉग बराच फिरतोय तरीही असंख्य लोकांपर्यंत माहिती पोचली नाहीय, कळेल हळुहळु 🙂

 9. संदीप गारू, एक सहजच सुचलं… तुम्ही मी… यापूर्वी काम करत होतो त्या इनाडू समूहाचं आंध्रातलं इनाडू हे वृत्तपत्रही तिथे पहिल्या क्रमांकाचं आणि सर्वाधिक विश्वासार्ह असं मानलं जात होतं, आता आनंद बाजार पत्रिकाही बंगालमध्ये सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र आहे. आपल्या मराठीत असं का होत नाही. मराठीमधील सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राचं स्वतःचं शंभरटक्के मालकी असलेलं आणि लोकप्रिय असं न्यूज चॅनेल का नाही, इनाडू किंवा आनंद बाजार पत्रिका याचं त्यांच्या त्यांच्या भाषेत लोकप्रिय असं न्यूज चॅनेल आहेच, तर मग मराठीचं चुकतं कुठे?…

 10. नक्कीच सर….. स्टार नाव जरी गेलं तरी आपल्या सारख्या मोस्ट शाईनिंग स्टार्स एबीपीत राहणार आहेतच… शेक्सपिअरच्या म्हणण्यानुसार नावात काय आहे… मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्ती किंवा संस्था आपल्या कतृत्वातुन नाव घडवते. ते नाव माझानं ब-याच आधी घडवलंय…. महाराष्ट्राचं आपलसं
  “माझा” असतांना आपल्याला वेगळ्या नावाची गरज नाही…

  • होय, शरद, लोकांना सुरुवातीला नाव थोडं अवघड जाईल, शेवटी ५ वर्षाची सवय आहे. पण आपली लोकं तिच आहेत, बातम्या हाताळण्याची पद्धत आपल्याला आवडते तशीच सडेतोड आहे याची खात्री पटली की एबीपी माझाही आपलंस वाटायला लागेल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s