थँक्यू डॉक्टर देशमुख

मना कधी नव्हे ते २-३ तास खूप रडली. आत्ताच झोपी गेल्याचं अंजलीनं सांगितलं. तिचं रडणं थांबत नव्हतं. विजयसोबत अंजली मनाला एका प्रथितयश डॉक्टरकडे दाखवून आलेली. विजय त्याच्या मुलीला त्याच डॉक्टरकडे घेऊन जायचा.म्हटलं बरं झालं, लहानांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. त्या डॉक्टरीनबाईनं मनाला कसलं तरी इंजेक्शनही दिलं होतं. त्या गुंगीतच ती कदाचित रात्रभर झोपली असावी.

मी सकाळीच ऑफीसला निघून गेलो. त्यावेळेस मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात यायचा होता. त्यामुळे घरी टचमधे राहण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी शिफ्ट संपवून घरी निघालो.

मना २-३ महिन्यांची झाल्यावरच तिला हैदराबादला आणुयात असं मी आणि अंजलीनं ठरवलेलं. आपल्या घरी म्हणजे बीडला माणसांचा-नातेवाईकांचा ओघ आटत नाही, तिथं  आजी-आबांसोबत गजबजल्या घरात असणं कधीही चांगलं. अशी अनेक कारणं.

Continue reading

Advertisements

CHANGE IS GOOD

स्टार माझा चॅनलचं नाव एबीपी माझा असं बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा कळला तेव्हा फार रुचला नाही.

कोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनाची आणि कोणाचीच तयारी नसते हे एक कारण,

तर ‘स्टार’ जाणार आणि त्याची जागा एबीपी अशी अजुन तोंडात न रुळलेली अक्षरं घेणार हे दुसरं.

खरं तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात -घराघरात मनावर कोरल्या गेलेलं, आपलं वाटणारं ‘स्टार माझा’ हे नाव ज्यावेळी पक्कं झालं त्यावेळीही आम्हा सर्वांना, ‘माझा’ काय चॅनलचं नावंय का? असंच वाटलं होतं. थोड्या फार फरकानं आताही तीच गत आहे. आज एबीपी माझा हे नाव सोशल नेटवर्किंग साईट्सवर गेलं आणि सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे…

ABP म्हणजे काय?

एबीपी म्हणजे आनंद बाजार पत्रिका.

हा भारतातला एक मोठ्ठा वृत्तपत्र समूह आहे. 

साधारण ९० वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये चार पानी सांयदैनिक म्हणून आनंद बाजार पत्रिकेची सुरुवात झाली. २ पैशाला मिळणारं या दैनिकाचा खप होता दररोज १ हजार. आज ९० वर्षांनंतर  आनंद बाजार पत्रिका राज्यात सर्वाधिक खपाचे दैनिक आहे, दररोज ७० लाख वाचकांच्या हातात पोचते.

आज एबीपी ग्रुप देशातल्या महत्वाच्या मीडिया हाऊसेस पैकी एक आहे. आणि पत्रकारितेसह वेगवेगळ्या क्षेत्रात एबीपीनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

एबीपीचं नाव बातमीदारीत एकदम विश्वासार्ह मानलं जातं. Continue reading