मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर

मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा मला प्रचंड आवडला. त्यानंतर मुन्नाभाई अॅग्रिकल्चर असाच सिक्वल येईल असं वाटत होतं, त्यात शेती शिक्षणातील उणीवांवर हसत हसत बोट ठेवलं जाईल आणि हा उपेक्षित विषय मेन स्ट्रिममध्ये येईल असं स्वप्न पाहात होतो.

तसं वाटायला एक छोटंसं कारण होतं…

या सिनेमात मेडिकल कॉलेज म्हणून जी भव्य वास्तू दाखवलीय ना 

मेडिकल कॉलेज? छे, हे तर शेती कॉलेज

ते आहे शंभर वर्षाची परंपरा असलेलं; महात्मा फुल्यांच्या प्रयत्नातून सुरु झालेलं पुण्याचं कृषी महाविद्यालय. मुन्नाभाई चित्रपटातील बऱ्याच महत्वाच्या प्रसंगांचं शुटिंग इथं झालं. राजू हिरानी म्हणा किंवा विधू विनोद चोप्रा म्हणा, त्यांना शुटिंगच्या निमित्तानं काही काळ तरी या शेती कॉलेजच्या कॅम्पसवर घालायला मिळालाय. त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असेल, शेती आणि शेतकऱ्याबद्दल त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल, शेतीचं शिक्षण कसं दिलं जातं, त्याचा कसा, कुणाला, किती फायदा होतोय याचा थोडाफार अंदाज त्यांना आला असेल, या कृषिप्रधान भारत देशासाठी या दमदार विषयाला प्रचंड स्कोप आहे हे लक्षात यायला त्यांना वेळ लागला नसेल आणि  म्हणूनच एमबीबीएसनंतर मुन्नाभाई यॅग्रिकल्चर चा प्लॅन त्यांनी फिस्क केला असेल असं मला वाटत होतं,

पण तसं झालं नाही…

आता वरचा फोटो पुन्हा पाहा

त्यांना शेतकऱ्याऐवजी गांधीगिरीनं भूरळ घातली आणि त्यांनी लगे रहो बनवला, त्यानंतर त्यांनी इंजिनिअरींग विषय घेत ३ इडियट्स बनवला. शेती इथेही दुर्लक्षित राहिली, त्यांना जास्त दोष दिला नाही. बेटा, मोठेपणी कोण होणार? हा सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आणि डॉक्तल नायतल इंजिनियल हे सर्वाधिक दिलं जाणारं उत्तर त्यांनीही ऐकलं असणारच की, त्याचा प्रभाव लवकर जातो थोडाच. असो.

शाळेत असताना कधीतरी ऑस्ट्रेलियन शिक्षण पद्धतीबद्दल ऐकलं-वाचलं होतं, त्यामुळेही असेल कदाचित पण मला आपली शिक्षण पद्धती कधीच आवडली नाही. आपण जे शिकतोय त्याचा आयुष्यात काय उपयोग होणार असा प्रश्न पडायचा; आणि उपयोग होणार नसेल तर या चारभिंतीत आपण आयुष्याची २०-२३ वर्ष वाया तर घालवत नाहीयत ना अशी भिती वाटायची. पुढे ती मोठ्ठ्या प्रमाणात खरी ठरली. (त्याचं बरंच श्रेय आपल्या शिक्षण पद्धतीला द्यायलाच हवं). मी कधीच हुशार वगैरे विद्यार्थी नव्हतो पण जे काही शाळा-कॉलेजात शिकवलं किंवा पास होण्याच्या धाकानं मी शिकलो; त्यातलं (काही बेसिक सोडलं) फार कमी मला व्यावहारिक जगात कामाला आलं किंवा येतंय.

Please Take RIGHT TURN

शिक्षण पद्धतीबद्दल माझ्या मतात काडीचाही फरक पडणार नाही याची काळजी शेती महाविद्यालयानंही घेतली. नाही म्हणायला चौथ्यावर्षी रावे (Rural Agriculture Work Experience) नावाचा प्रकार होता. तो माझा फेव्हरेट काळ, खरं शिक्षण मला रावेच्या त्या ६ महिन्याच्या काळातच मिळालं, बाकी काळ्या आईची सेवा काळ्या फळ्यावर  करण्यातच ४–६ वर्ष गेली, तशीच हजारो विद्यार्थ्यांची जातायत, अजूनही… थोडाफार फरक जरुर पडला असेल पण तो या सिस्टीमला नजर लागू नये इतकाच. गेल्या ३० दिवसात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या कृषीमंत्र्यांनी शेतीशिक्षण-संशोधन-विस्तारावर चिंता व्यक्त केली होती हे विशेष.

या ४ वर्षाचा आणि ग्रामीण भागातून आलेल्या, महाराष्ट्राच्या मातीचा रंग-गंध माहिती असलेल्या त्या मुलांचा फार चांगला वापर शेती विकासाच्या कामात करुन घेता येणं सहज शक्य आहे.

वर्गामधली-ब्लॅकबोर्डवरची, प्रयोगशाळेतली, पुस्तकातली शेती आणि वास्तवातली शेती यात जमीन-आस्मानचं अंतर नसेल कदाचित; पण फक्त विचार करणे आणि actual कृती करणे यांत जितकं अंतर आहे तेवढं अंतर निश्चित आहे. आपलं शेती शिक्षण गेली अनेक वर्ष विचारच करत आहे. देशातली शेती आणि शेतकऱ्याचं भविष्य कोमात जाण्याआधी; शेती शिक्षणाला विचार करण्याच्या अवस्थेतून बाहेर काढून कामाला लावायला हवं.  हे काम एखाद्या मुन्नाभाईनंही केलं तर आपली हरकत नाही बुवा. बोले तो शेतीला एक जादू की झप्पी मिळेल, क्या बोलताय मामू?

उशीरा का होईना हिरानी-चोप्रांचे (किंवा एखाद्या मराठी निर्मात्याचे) डोळे उघडतील आणि मुन्नाभाऊ शेतकरी आपल्या भेटीला येईल अशी आशा. त्याने प्रश्न सुटतील का? तर नाही… पण त्यानिमित्तानं मूळात काही प्रश्न आहेत हे तरी समोर येईल.

8 thoughts on “मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर

 1. Ys Sandeep, Hope your desire and wish reaches out to Raju Hirani. MunnaBhai Ygriculture cld atleast highlight the farmers crises. There are serious issues as rightly pointed out by you regarding our educational system and its usefulness in reality. Only if Raju Hirani cld take interest in this subject!!! And We will be able to see Munnabhai Ygriculture!

 2. संदीपजी खूप छान विषय मांडलात आपण, गरज आहे त्याची.
  आजही जपान तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतका पुढारलेला असतानाही तिथे शेतीला अग्रक्रम दिला जातो.
  मी ज्या जापनीस कंपनी मध्ये काम करतो त्या कंपनीचे management ची लोक स्वतः शेती करतात व स्वतापुर्ते का होईना धान्य पिकवतात. पण ते हे का करू शकतात, तर त्यांच्याकडे त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच बर्याच कमी वेळात ते हे सर्व करू शकतात. आपण जर हे सर्व करायला गेलो तर मला वाटतंय नोकरी सोडूनच करावे लागेल.
  आपल्याकडे शेती हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. फक्त नारेबाजी केली कि झालं…….

 3. first of all लेख खरंच चांगला आहे.. विचारही चांगला आहे…
  महत्त्वाचं (निशिकांत भालेरावांचं म्हणणंही अगदी बरोबर आहे)
  सर्वात प्रभावी माध्यम आपल्या हातात आहे.. त्याचा वापर करून आपण बदलाला सुरूवात करू शकतो.. (तसे प्रयत्न होतायतही.. पण तेवढे पुरेसे आणि प्रभावीपणे नाही.. )
  एकंदर तरूणांची शेतीबद्दली माणसिकता बदलणं, आणि शेतीच्या पद्घती बदलणं ही प्राथमिक गरज आहे… अर्थात याला वेळ लागेल.. पण हे बदल घडवण्यासाठी आपण माध्यमांच्या सहाय्यानं सिंहाचा वाटा उचलू शकतो… बाकी बदलाची रणणिती तुम्हीच माझ्यापेक्षा जास्त प्रभावीपणे ठरवू शकाल..

 4. sandip Kantala aalay ka beet cha? Aaplya hati itke prabhavi madhyam aahe tyatun kahi tari karta yeil.Munnabhai kashala havay?

  • नाही, कंटाळा नाही आलाय सर, अजून भरपूर पेशन्स आहेत (म्हणजे असं मी समजतो). शेतीमधल्या चार चांगल्या गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोचत राहिल्या पाहिजेत; माध्यम कुठलं का असेना. आपण तर करत आहोतच मोठ्या पडद्यानं-मुन्ना किंवा आणखी कुणी वाटा उचलला तर चांगभलं.

 5. अहो, ज्यांनी शेतीविषयात लक्ष घालायला हवे त्यांचेच घोडे वांगे खाताहेत.
  मग बिच्चार्‍या मुन्नाभाईकडून तरी कशाला अपेक्षा करायची?
  छान लेख. आवडला.
  ……………………………………………
  http://www.baliraja.com
  पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

  • धन्यवाद. जसं यंगस्टर्समध्ये-९० नंतरच्या पिढीमध्ये ‘लगे रहो’नं गांधीजींबद्दल कुतूहल निर्माण केलं तसं काहीकाळासाठी का असेना मुन्नाभाईमूळं शेतकऱ्याबद्दल झालं तर? शेतीतले खरे प्रश्न, शेतकरी घेत असलेल्या कष्टाबद्दलची माहिती, शेतकऱ्यांबद्दलच्या २ चांगल्या गोष्टी तरुणांपर्यंत पोचतील.
   बाकी तुम्ही म्हणताय तसं कोणाकडनं फार काही अपेक्षा करण्यात खरंच अर्थ नाहीय हेच खरं.

 6. khup chhan.Atachya ghadila Agriculture ha part seriously ghene mahatwache zale aahe (both for career issue & political,developement wisse).this sector needds some attention.

  jai AGRICOS

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s