बच्चनने १-२ चित्रपटात म्हटल्याप्रमाणे इस दुनिया में दो तरह के इन्सान होते है…
जे पहिल्या प्रकारातले असतात ना ते छोट्या छोट्या गोष्टींचा, समस्यांचा बाऊ करत जगत असतात.
दुसऱ्या प्रकारातले असतात ना; ते कितीही कठीण प्रसंग आला तरी डगमगत नाहीत, त्याच समस्या त्यांनाही असतात, त्रास त्यांनाही होत असतोच पण ते त्यावर मात करत यशाकडे आपली वाटचाल चालू ठेवतात. स्वत: समाधानी राहतात आणि आपल्या अनुभवाचा इतरांना कसा फायदा होईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहतात.
शेतीक्षेत्रातही अर्थातच दोन्ही प्रकारचे लोक आहेत…
मला दुसऱ्याप्रकारचे अनेक शेतकरी भेटले, मातीतील मोती च ते…
शेतीतलं त्यांचं काम पाहून अशक्य काही नाही यावर विश्वास बसतो. सगळीकडे निराशेचं वातावरण दाटून आलेलं असताना ही मंडळी आपल्या कामातून आपली आशा टिकवून ठेवतात. अशा काही मातीतील मोतींसोबतचा माझा अनुभव मी इथे द्यायचा प्रयत्न करणार आहे.
शेवटी बाबा बच्चननी सांगितल्याप्रमाणे दुनियामें दो तरह के लोग होते है,
कोणाकडून काय घ्यायचं ते आपल्यालाच ठरवायचंय…
Sir nice