बातम्यांमागील बातम्यांना प्रचंड महत्व असतं…
पण त्या देणं, त्याचं विश्लेषण करणं हे तज्ज्ञ वगैरे पत्रकारांचं, विश्लेषकांचं काम..
आपण काही रुढार्थाने वगैरे पत्रकार नाही, तज्ज्ञ तर बिल्कुलच नाही… पण क्युरियस मात्र नक्कीच आहोत… आणि आपल्यासारख्या क्युरीयसांसाठी सगळंच महत्वाचं
कधीकधी तर न घडलेल्या बातम्या किंवा घडता घडता राहिलेल्या किंवा न-बातम्या असलेल्या बातम्याही तितक्याच महत्वाच्या…
या सदरात फक्त कल्पना विस्तार केलेल्या घटना असतील हे ध्यानात ठेवा
शेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर या ब्लॉगला तुफान रिस्पॉन्स आला त्यामुळेच
असं झालं असतं तर कसं झालं असतं वगैरे विचार करणारांसाठी The News That Wasn’t
अर्थात अजेघना म्हणजेच ‘अगा जे घडलेचि नाही’