Why CASINO ROYALE is the Best James Bond Film

Reblogged from Reel Fanatics:

  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post

by Michael Neelsen

I was lukewarm on James Bond movies before I saw CASINO ROYALE. I had really enjoyed GOLDENEYE and THE WORLD IS NOT ENOUGH as an adolescent, but as I grew older I began to grow weary of the over-the-top cornball approach taken by the majority of the films (epitomized by DIE ANOTHER DAY). I had no reason to care about the character of Bond -- he'd become too unreal.

Read more… 1,497 more words, 1 more video

जेम्स बाँडच्या चित्रपटांपैकी माझा सर्वात आवडता 'कसिनो रोयाल'. त्याच्याबद्दल लिहायचं अनेकवेळा ठरवलेलं, नेहेमीप्रमाणेच जमलं नाही. त्यातच ही लिंक सापडली, यात मला आवडलेले जवळपास सगळे मुद्दे आहेत.. फक्त इंग्रजीत :-)

बाई मी धरण बांधते

“पेरा पेरात साखर त्याचं पिकलं शिवार, घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते “

एकिकडे भीषण दुष्काळ, पाणी टंचाई तर दुसरीकडे याच पाण्यावर ऊस कारखानदारीची सूज; असं राज्यातलं चित्र. या असमतोलावर आणि त्याला कारणीभूत असलेल्या राजकारणावर कधी नव्हे इतकी टिका होतेय, त्याचा फारसा परिणाम होणार नसला तरीही.

याच स्थितीचं वर्णन ‘बलुतं’कार दया पवार यांनी केलं होतं.  ते आठवण्याचं कारण Read the full post »

राहुलगिरी

भारतीय उद्योग महासंघ म्हणजेच CII च्या परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण झालं.

इतक्या मोठ्या आणि अनेक अर्थानं महत्वाच्या प्लॅटफॉर्मवर आपली मतं मांडण्याची त्यांची ही पहिलीच वेळ.

काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या गोरखपूर- मुंबई ट्रेन प्रवासातील अनुभवांनी भाषणाची सुरुवात केली. सुतारकाम करुन पोट भरायला मुंबईकडे येणाऱ्या गिरीशचा किस्साही त्यांनी सांगितला.

थोडक्यात तो किस्सा असा :-

आणखी एक संधी... गमावलेली
I spoke to a young Muslim boy; setting out to start his new life. He had no idea what work he is going to do. I asked him, BOSS; what happens if you reach Mumbai and there is nothing for you to do?

If I reach Mumbai & there is nothing to do, I will get into the train and go to Bangalore. Read the full post »

How is 2012-13 Maharashtra Drought worse than the one in 1972?

Reblogged from SANDRP:

Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post
  • Click to visit the original post

Maharashtra is facing one of the worst droughts this year. Union Agriculture Minister Sharad Pawar as well as Chief Minister Prithviraj Chavan have said that this year’s drought is worse drought than the one in 1972, which was termed as a ‘famine’. Maharashtra has the highest number of large dams in the country and is now claimed to be suffering the worst drought in four decades or more.

Read more… 1,710 more words

हा दुष्काळ खरंच 1972 पेक्षा भयानक आहे का?

ऐतिहासिक कर्जमाफीचं ऑडिट

फक्त हेतू चांगला असून चालत नाही, अंमलबजावणीही चांगली हवी. याचा प्रत्यय तथाकथित ऐतिहासिक कर्जमाफीवरुन येत आहे. आस्मानी आणि सुलतानीशी लढा देवून थकलेल्या शेतकऱ्यांची ७१ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर होऊन पाच वर्ष उलटली. त्यात शेतकऱ्यांचा कळवळा कमी आणि मतांचं राजकारणच जास्त होतं. मलमपट्टी असली तरी कर्जमाफीची योजना बऱ्याच छोट्या, पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी होती यात शंका नाही. तसं असलं तरी अंमलबजावणीतला फोलपणा गेल्या पाच वर्षात वारंवार समोर आलाय.

कॅगचे ताशेरे

कॅगचे ताशेरे

आता Comptroller and Auditor General of India म्हणजेच कॅगनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय इतकंच.  Read the full post »

शेतकऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं

आदर्श प्रकरण अनेकांसाठी इष्टापत्ती ठरलं. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री तर बदललेच सोबत अनेक मंत्र्यांची खातीही बदलली. त्याचवेळी राज्याला नवा कृषीमंत्री मिळाला. राधाकृष्ण विखे पाटलांची कामाची पद्धत आधीच्या कृषीमंत्र्यांपेक्षा वेगळी आहेच, त्याचा सुरुवातीला त्यांना (आणि कृषी विभागाला) त्रासही झाला असणार. महिको मोनसँटोवर बंदीचा अवघड तितकाच धाडसी निर्णय असो किंवा बाजार समित्या सुधारणांसाठी प्रस्थापितांच्या मागे लागणं असो. यात शेती विकास किती आणि राष्ट्रवादीला खिंडीत गाठायचं राजकारण किती असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.  

दुष्काळापासून ते  शेतीतल्या इतर अनेक समस्या आहे तशाच आहेत. दुष्काळावर शाश्वत उपायांसाठी काही ठोस, दूरगामी पावलं त्यांनी उचलली तर महाराष्ट्राच्या शेती इतिहासात वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी अजुनही त्यांच्याकडे आहे.  विखे पाटील गेली दोन-सव्वा दोन वर्ष राज्याच्या शेतीचा कारभार बघतायत. दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं आहे तसंच आहे किंबहुना ते आणखी वाढल्याचं विखे पाटलांना जाणवत असेल का? वेळ कमी आहे आणि अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.  ते कृषीमंत्री झाले त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या राधाकृष्ण विखे पाटलांकडून काय अपेक्षा होत्या ते स्टार माझाच्या ब्लॉगसाठी लिहिले होते. तो पुन्हा इथे देत आहे.  

ओझे अपेक्षांचे शुक्रवारी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात महसूलमंत्रीपदाची बढती स्वीकारत होते आणि  राधाकृष्ण विखे पाटील राज्याच्या कृषीमंत्रीपदाची सूत्रं हाती घेत होते त्याचवेळी जळगावचे दोन शेतकरी अमेरिकेच्या वाटेवर होते. Read the full post »

इमोशनल फुलांच्या देशा…

आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत.

आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे.

सर्वसामान्य लोकांना बेसिक सुविधा द्यायची ज्यांच्यावर जबाबदारी असते ते सरकार, ती राजकारणी मंडळी वर्षानुवर्षे आपल्याला फाट्यावर मारत असतात. पण वेळ आली की, ‘लोकशाहीत जनताच राजा आहे’ असं नेते म्हणतात, आपण खूश होतो.  प्रत्यक्षात पाच वर्षात एकच दिवस- मतदान यंत्राचं बटन दाबेपर्यंत राजा, बाकी 1825 दिवस कोण कुठला राजा? एक दिवस प्रजासत्ताक, बाकी नेतासत्ताकच.

तिच गोष्ट साखर उद्योगाची. साखर कारखाने म्हणजे राज्यातल्या राजकारणाचा दिंडी दरवाजाच. लाखो शेतकरी आणि हजारो कोटींचा उद्योग. पण ऊसाला दर द्यायची वेळ आली की राजकारण्यांमधला कारखानदार जागा होतो. जास्त दर देणं कसं अवघड आहे यावर त्यांचं चटकन एकमत होतं. Read the full post »

2012 in review

हे वर्ष जरा जास्तच लवकर संपलं ना.. कळलंही नाही.

यंदांचा दुष्काळ असेल, त्यामागचं राजकारण असेल, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधे लाजिरवाणा पराभव असेल, द्रविडची  निवृत्ती असेल, आझाद मैदानावरचा हिंसाचार असेल,  बाळासाहेबांचं जाणं असेल की स्वतहाला पुरुष म्हणून घेण्याची लाज वाटायला लावणारा; संतापाचा कडेलोट करणारा दिल्ली गँगरेपचा प्रकार असेल…

या वर्षात बऱ्याच घटना-प्रसंग असे होते की ते तुमच्यासोबत शेअर करावे वाटले होते.. लिहायला सुरुवातही व्हायची पण…

मला वाटायचं शेतीच्या घडामोडीत किती लोकांना इंटरेस्ट असेल? पण यंदाच्या माझ्या टॉप 3 ब्लॉगपैकी एक ठरला गेल्यावर्षी लिहिलेला आफ्रिकेच्या शिंगातला दुष्काळ हा ब्लॉग.  मी यंदाच्या दुष्काळाचं भीषण वास्तव आमच्या कार्यक्रमात दाखवून न थांबता, माझे अनुभव-मत इथेही मांडायला हवं होतं.

आवडलं, भिडलं, वाटलं की लिहिलं पाहिजे ते आळशी स्वभावानं दरवर्षी प्रमाणे यंदाही जमलं नाही..  पश्चातापाचा आता उपयोग नाही मात्र हे टाळणं माझ्याच हातात आहे,  नव्य़ा वर्षात लिखाणात सातत्य आणण्याचा जोरदार प्रयत्न करणार.

माझ्या ब्लॉगसाठी 2012 हे वर्ष कसं गेलं ते वर्डप्रेसनेच दिलंय ते फक्त शेअऱ करतोय. ही ती लिंक 

तुम्ही भरभरुन प्रेम देत आहात, ते कायम राहील याची काळजी मी घेईन.

Here’s an excerpt:

600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 8,500 views in 2012. If every person who reached the top of Mt. Everest viewed this blog, it would have taken 14 years to get that many views.

Click here to see the complete report.

 

बोलतो जे अर्णव

एके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा? मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं.. नशीब.

इतना क्यूं सोचते हो तुम?

Read the full post »

टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये

मीडिया बाजार

दूरदर्शनवर रामायण अवतरलं त्यावेळी देशभरात रस्ते ओस पडायचे. रामानं रावणाचा वध केला त्या रविवारी कित्येत घरात टीव्हीवर फुलं उधळली गेली. तोच प्रकार कमीअधिक प्रमाणात महाभारताच्या वेळी. शक्तिमान सुरु होतं तेव्हा स्वत:चा एक हात छातीवर आणि एक हात वर करत स्वत:भोवती गरगर फिरत वरुन खाली झोकून देणाऱ्या कितीतरी लेकरांनी हात पाय मोडून घेतले, काहींना जीवही गमवावा लागला. कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनच्यावेळी स्पर्धकांसोबत रडणारे आणि नवाथे करोडपती बनला तेव्हा ते कोटभर रुपये आपल्याच घरात येणार असा आनंद झालेले कमी नव्हते. टेलिव्हिजनची ताकद, माध्यमाचा प्रभाव अधोरेखित करणाऱ्या घटनांची ती नांदी होती.

बातम्यांची मक्तेदारी तेव्हा सरकारी दूरदर्शनकडेच होती. लोकांच्या गरजांचा विचार करायचा नाही आणि काळासोबत चालायचं नाही हा अलिखित सरकारी नियम दूरदर्शननेही इमानेइतबारे पाळला. त्यामुळेच, गरज होती म्हणा किंवा एखादा नवा पर्याय मिळाला की लोक स्वीकारतात म्हणा, खाजगी न्यूज चॅनल्स कधी आले, कधी वाढले, कधी पुढं गेले हे कळलंही नाही. Read the full post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 1,876 other followers

%d bloggers like this: